Amalner

Amalner: Women’s Day: महिलांची कुचंबना.. स्वच्छतागृहांची दूरवस्था…प्रशासनाचे दुर्लक्ष…!

Women’s Day: महिलांची कुचंबना.. स्वच्छतागृहांची दूरवस्था…प्रशासनाचे दुर्लक्ष…!

अमळनेर येथील महिला स्वच्छता गृहांची दुरवस्था असून प्रशासन फक्त मोठं मोठ्या गप्पा मारत आहे.महिला सबलीकरण सक्षमीकरणा चे कार्यक्रम राबवित आहे.पण महिलांसाठीच्या अत्यन्त आवश्यक आणि गरजेच्या प्रश्नात मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे एक वेळ अशी होती की अमळनेर तालुक्यात सर्व महिलाच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होत्या.त्यावेळी देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.यासंदर्भात विविध निवेदने देखील देण्यात आली होती.विशेष म्हणजे सरकारी कार्यालयात देखील महिला शौचालयांची स्थिती अत्यन्त वाईट आहे.

भरीस भर महिला शौचालयाचे साहित्य चोरीला..! नव्याने तयार करण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात त्यावेळी ग्रेनाइट लावुन पाण्याची टाकी, वॉश बेसीन, नळ, लाईट या सर्व सोई उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सध्या या स्वच्छतागृहांमध्ये भिंतींवर लावलेले ग्रेनाइट सोडुन इतर सर्व साहित्य चोरी करुन नेलेले दिसत आहे. मात्र त्यासंदर्भात पालिका प्रशासनाने काहीही केलेले नाही, हे विशेष. मलमूत्र विसर्जन ही नैसर्गिक बाब आहे. स्त्रियांसाठी जेथे शौचालये आहेत ते कमालिचे अस्वच्छ आहेत. त्यातून रोगराई पसरण्याची भिती आहे. स्त्रियांनी मग जायचे कुठे? असा प्रश्‍न असून त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

शहरात कामानिमित्त बाहेर पडणार्‍या महिलांना वापरता यावे यासाठी पालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. मात्र या स्वच्छतागृहांची कुठलीही काळजी घेण्यात येत नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीअभावी महिलांची पराकोटीची कुचंबना होत आहे.
शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यातील नागरिक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात. शिवाय प्रमुख बाजारपेठही असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक येतात. त्यात महिलांची संख्या मोठी असते. त्यांना दिवसभर कामानिमित्त शहरात फिरावे लागते. अशा स्थितीत शहरातील बाजारपेठ किंवा महत्वाचा परिसर या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची कुठेही व्यवस्था नव्हती. यासंदर्भात वारंवार होणार्‍या मागणीनंतर नगरपालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठेत 3, तहसील चौक परिसरात 1 आणि आठवडी बाजार परिसरात 1 अशा एकुण पाच स्वच्छतागृहांची निर्मिती केली होती. त्यावेळी प्रत्येक स्वच्छतागृहासाठी 6 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

त्यातुन सर्व सोयी उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीकडे पालिकेच्या वतीने कधीही लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या स्वच्छतागृहांची सध्या दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे स्वच्छतागृह असुनही महिलांना त्याचा उपयोग घेता येत नाही. स्वच्छतागृहांअभावी महिलांची होणारी कुचंबना थांबवावी या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे स्वच्छता गृह आता अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याने महिलांपुढे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे यासंदर्भात पालिकेच्या वतीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यवसायीक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे.

बाजारपेठ परिसरात असलेले स्वच्छतागृह रात्री बाजारपेठ बंद झाल्यावर बेवारस पडलेले असते. अशावेळी मद्यपी आणि परिसरातील नागरिक त्याचा गैरवापर करतात. त्या ठिकाणी अशा नागरिकांकडून घाण करुन ठेवण्यात येते. नियमीत स्वच्छता होत नसल्याने त्यातुन दुर्गंधी येते. त्यामुळे सध्या हे स्वच्छतागृह अस्वच्छतेने भरुन असलेले दिसत आहे. बाजारपेठ सुरू झाल्यावर ती बंद होईस्तोवर बाजारपेठेतील स्वच्छतागृह सुरू ठेवावेत. त्यानंतर रात्री त्याला कुलूप लावून ठोकावे. स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि रात्री कुलूपबंद करण्याची आणि ते वेळेवर उघडण्याची जबाबदारी परिसरातील व्यवसायिकांवर सोपवावी. तसे केल्यास बाजारपेठेत येणार्‍या महिलांना त्याचा वापर करता येईल आणि त्याची निगा देखील ठेवणे सोईचे होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button