Khirdi

कै.सुधाकर विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ऐनपूर प्रा.आ. केंद्रास उपसरपंच सौ.दिपाली पाटील यांच्याकडून 31 खुर्च्या प्रदान..!

कै.सुधाकर विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ ऐनपूर प्रा.आ. केंद्रास उपसरपंच सौ.दिपाली पाटील यांच्याकडून 31 खुर्च्या प्रदान..!
प्रवीण शेलोडे खिर्डी
खिर्डी : कोरोना संकटकाळात मदतीसाठी अनेक लोक पुढे येत आहेत त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना महामारी आजार रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली असून या आरोग्य केंद्रात दररोज लसीकरणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे लोक सकाळपासूनच नंबर लावण्यासाठी रांगेत उभे राहतं आहेत त्यात वृद्ध लोकांचा समावेश सुद्धा आहे सध्या 45 च्या वरील लोकांचे लसीकरण सुरू आहे त्यात उन्हाचा तडाखा ही खूप वाढलेला असल्याने त्यात लोकांना बसण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक तासन-तास लसीकरणासाठी उन्हात उभे रहावे लागते त्यामुळे बऱ्याच लोकांना उन्हामुळे थकवा येतो व चक्कर सुद्धा येतात त्यांच्या या समस्या लक्षात घेता बसण्याची सोय व्हावी म्हणून गावचे उपसरपंच यांनी आपण सुद्धा समाजाचे काही देणे लागतो ही सामाजिक भावना जोपासत येथील वृद्ध महिला जेष्ठ नागरिक, जे लसीकरणासाठी येतात त्यांच्यासाठी येथील कर्तव्यदक्ष उपसरपंच सौ.दिपाली अतुल पाटील यांनी कै.सुधाकर विश्वनाथ पाटील यांचे स्मरणार्थ,31 खुर्च्या उपलब्ध करून दिल्या तसेच यापुढेही कुठलीही अडचण आल्यास समस्येचे त्वरित निराकरण केले जाईल असे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित वैद्य.अधिकारी डॉ.विनायक महाजन डॉ.चौरे ,सरपंच-अमोल महाजन,उपसरपंच सौ.दिपाली अतुल पाटील,उपसरपंच पती अतुल सुधाकर पाटील,भगवान महाजन,नजीर मेंबर,व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button