शिरूड परिसरात डासांचा उपद्रव …नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रजनीकांत पाटील
अमळनेर: शिरूड परिसरात डासांचा चांगला च उपद्रव झाला आहे. या कडे लक्स देण्यास टाळा टाळ होत असल्याचे दिसत आहे. या कडे कोणी लक्स देईल का असा प्रश्न नागरिकांत पडला आहे.
परिसरातील डासांच्या प्रमाण अतिशय वाढ झाल्याने साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळीस घरात तसेच घराच्या बाहेरील परिसरात आजूबाजूला ओट्या लगत गटारी वरील बाजूस डास मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडतात.
गल्लो गल्ली परिसरात डास निर्देशानात येत आहे. अशा ठिकाणी डास प्रतिबंध फवारणी व्हावी तसेच गटारीवर द्रवरूप औषध टाकण्याचे काम व्हावे डासां पासून नागरिकांनी सुटका करून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे. अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.






