? भिसी येथील सागवान तस्करी प्रकरणात मोरक्या कोण वनविकास महामंडळाच्या फिरत्या पथकावर दबाव कुणाचा?
चिमूर तालुका प्रतीनिधी (ज्ञानेश्वर जुमनाके)
चिमूर वन परीक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र भिसी परीसरात पहिल्यादा अवैध सागवान लाकूड तोडून मोठया प्रमाणात साठवण केल्याची माहिती वनविकास महामंडळ खड्संगी फिरते गस्ती पथक वनपाल बलय्या यांना मिळाली असता भिसी जमगाव रस्त्याच्या काही अंतरावर आढळून आला त्यात १७.५१३ घन मीटर व ९ साग बिटे असा ७ लक्ष्य ३२ हजार ३१८ रूपयाचा माल वनविकास महामडळाच्या फिरत्या पथकाने दि १३/४/२०२० २ोज सोमवारला पकडून दिल्यानंतर अवैध सागवान तस्करी प्रकरण एका पाटोपाट एक समोर आले असले तरी वनविकास महामडळ व वनविभाग यांच्यात या प्रकरनाने मतभेद समोर आले असल्याचे दिसून येत असून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला असल्याने या दोन विभागात समनव्यय नसल्याचे दिसून येते वास्तविक वनांचे रक्षण ,संवर्धन,वनसंपती ,वन्यजीव हे दोन्ही विभागाचे कर्तव्य आहे पण या कार्यवाही वरून कलगीतुरा झाल्याचे चर्चेला उधान आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असनाऱ्या वनविकास महामंडळ व प्रादेशिक वनविभाग या शाखा आहेत. या दोन्ही विभागाचा परीसर, कार्यक्षेत्र वेगडे असले तरी दोन्ही विभागाची कार्य जवळपास मिळते जूळते आहेत. वनवीकास महामंडळाच्या फिरत्या गस्ती पथकाला भिसी उपवन क्षेत्रा अंतर्गत येनाऱ्या जामगाव २ोड लगत अवैध सागवानची मोठया प्रमाणात साठवनूक करून ठेवल्याचे बाब लक्ष्यात येताच धडक कारवाई केली. यामूळे सबंधीत अवैध ठेकेदार तथा भिसी येथील वनअधिकाऱ्याल्या धसका बसला त्यामूळे स्थानीक वनविभाग व वनविकास महामंडळ यांच्या अवैधरित्या सागवान रुपयांच्या मुल्याखनातही तफावत दिसून आली होती .






