Lonand

लोणंद शहरात मोरया नगर मध्ये गतिरोधक तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन गणेश भोसले

लोणंद शहरात मोरया नगर मध्ये गतिरोधक तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन गणेश भोसले

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 16 प्रतिनिधी फलटण पुणे रोडवर लोणंद शहरात मोरया नगर विभागात इंदिरानगर भाटिया कॉलनी, झारे गिरी झोपडपट्टी, कोरेगाव रोड ,स्मशानभुमी रोड, बाळासाहेब नगर, लोणंद पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन रोड ही सर्व स्थळे याच रस्त्यापासून सुरु होतात.

एमआयडीसीमधील वाहने लांब पल्ल्याच्या बसेस वडापाव यामुळे सतत वर्दळीचा चौक म्हणून या चौकाची गणना आहे. अनेक लहान-मोठे छोटे अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत.

या रस्त्यावरून शरद चंद्र पवार कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी सातत्याने ये-जा करीत असतात.ग्रामस्थ या पंचक्रोशीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला ,शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी रस्ता पार करीत असताना अपघाताला निमंत्रण दिले जाते.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक तातडीने बसवावेत शहरातील लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरपंचायत या ज्वलंत बाबीकडे लक्ष देत नाही. रात्रीच्या वेळेला पिलेले ड्रायव्हर वेगवान वाहने चालवून अपघात झाला तरी दवापाणी पाहत नाहीत तरी गतिरोधक तातडीने बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेश भोसले यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button