Pune

इंदापूर तालुक्यात पदवीधरांनी केले 57.60 टक्के मतदान तर शिक्षकांनी 83.67 टक्के

इंदापूर तालुक्यात पदवीधरांनी केले 57.60 टक्के मतदान तर शिक्षकांनी 83.67 टक्के

दत्ता पारेकर पुणे

Pune : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत इंदापूर तालुक्यात पदवीधर मतदार संघात 57.60 टक्के मतदान झाले आहे.तर शिक्षक मतदार संघासाठी 83.66 टक्के मतदान झाले आहे. पदवीधर मतदानासाठी इंदापूर केंद्रावर एकूण 4227 मतदानापैकी 2393 (56.61%) मतदान झाले. तर बावडा येथे 2739 मतदानापैकी 1585 ( 57.87%), निमगांव केतकी 1974 मतदानापैकी 1169 (59.22%) सणसर 1006 मतदानापैकी 613 (60.93%)तर भिगवण 911 मतदानापैकी 494(54.24%) मतदान झाले. एकूण मतदान 10,857 पैकी 6254 (57.60%) मतदान झाले आहे.

तर शिक्षक मतदार संघात इंदापूर शहर केंद्रात एकूण 433 मतदानापैकी 360(83.14%) बावडा 223 पैकी 209 (93.72%) निमगांव केतकी 319 पैकी 257 ( 80.56%) सणसर 154 पैकी 128 (83.12%) तर भिगवण एकूण 95 मतदानापैकी 70(73.68%) मतदान झाले.एकूण 1224 मतदानापैकी 1024 (83.66%) इतके मतदान झाले आहे.

आज सकाळी इंदापूर तालुक्यातील मतदान केंद्रांवर पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती.सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करुन मास्क व सँनिटायझर चाही वापर मतदान केंद्रात सक्तीचा करण्यात आला होता.याच सोबत मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे कोरोनापासून संरक्षण होणेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button