Pune

भिगवणमध्ये भरदिवसा सात लाखांच्या रोकडवर चोरट्याचा डल्ला…

भिगवणमध्ये भरदिवसा सात लाखांच्या रोकडवर चोरट्याचा डल्ला…

प्रतिनिधी : दत्ता पारेकर

पुणे : एका अज्ञात चोरट्याने दुकानामध्ये ठेवलेल्या बॅगेवरती डल्ला मारत सात लाखांचा ऐवज चोरून नेला आहे ऐन सणासुदीच्या काळात अशी चोरीची घटना घडल्यामुळे दुकानदाराचे तोंडचे पाणी पळाले आहे. सदर चोरटा सीसीटीव्हीफुटेजमध्ये कैद झाला असून वीस ते पंचवीस वर्षांचा युवक असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उत्तम विष्णु पन्हाळकर (वार्ड क्र. २ भिगवण,ता. इंदापूर) हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात आले असता त्यांनी दुकान उघडून आपल्याजवळील पैशांची बॅग सुदर्शन ट्रेडर्स या होलसेल दुकानात काऊंटरजवळ ठेवली व समोर असणाऱ्या पान टपरीकडे आले लगोलग एक अनोळखी युवक येवून त्याने ती पैशाची बॅग नेवून पोबारा केला. दुकानात येवून पाहिले असता पन्हाळकर यांना बॅग दिसून न आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे अज्ञात चोरट्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्हाळकर यांचे भिगवण बाजारपेठेत सुदर्शन ट्रेडर्स नावाचे गोळ्या बिस्किटाचे होलसेल दुकान आहे. त्यांनी कर्जाची रक्कम पतसंस्थेत भरण्यासाठी आणली होती मात्र चोरट्यांनी क्षणात त्यावर डल्ला मारला आहे भर बाजारपेठेत सकाळी चोरीची घटना घडल्याने दुकानदारांनी धास्ती घेतली आहे.
घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यामध्ये अनोळखी युवक वीस- पंचवीस वर्षांचा असल्याचे दिसत आहे.लगतचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश काळे करीत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून व्यापारी,दुकानदार यांनी आपली रोकड व्यवस्थित हाताळावी त्याचप्रमाणे सर्वांनी दुकानात सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे त्यामुळे चोरीस आळा बसण्यास मदत होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button