Bhadgaw

भडगाव येथे महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी

भडगाव येथे महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी

दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन — खासदार उन्मेश दादा पाटील

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकार विरोधात आंदोलन

नूरखान

भडगाव — आज भारतीय जनता पार्टी यांच्या कडून विविध मागण्यांसाठी दुपारी 1 वाजता पारोळा चौफुली आंदोलन करण्यात आले भर दुपारी सर्व पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनला सुरुवात करण्यात आली सुरूवातीला महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या ठिकाणी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदधिकारी यांनी पारोळा चौफुली वर खाली बसुन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत की दुध उत्पादकांना सरसकट 10 रू प्रति लिटर अनुदान तसेच दुध पावडरला प्रति किलो 50 रू अनुदान मिळायला हव, भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या घरात पडुन असलेला कापुस ,मका,ज्वारी त्वरित खरेदी करण्यात यावी ,भडगाव तालुका शेतकरी संघात नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवाचा माल लवकर खरेदी करून व व्यापाऱ्यांनी शेतकरीच्या नावे आपला माल भडगाव शेतकरी संघात विकला आहे या सर्व काळाबाजाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व शेतकरी बांधवांना न्याय मिळावा ,सर्व सामान्य जनतेला मागील तीन महिन्यांचे वाढीस व अन्यायकारक पध्दतीने वीजबिल देण्यात आले हे विजबिल शासनाने त्वरित माफ करावे ,मागील दोन महिन्यात युरियाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे व सर्व सामान्य शेतकरी बांधवांना युरिया मिळत नाही व युरिया साठी शेतकरी बांधवाचे हाल होत आहे ,या सारख्या अनेक मागणी साठी आंदोलन करण्यात आले
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकट काळात राज्यभरातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस सुद्धा अनुदान दिले जात होते. आता तर दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र राज्यातील नाकर्ते सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाय योजना राबवली नसून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान मिळाले पाहिजे, दूध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे आणि दूध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये व्हायला पाहिजे, या महत्त्वाच्या मागण्या आम्ही राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. आम्ही हे आंदोलन झोपलेल्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी केले आहे. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन यावर त्वरित तोडगा काढावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी केली.

*कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी भडगाव दणाणले*

याप्रसंगी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.अनेक मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांना जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अमोल नाना पाटील ,पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे ,भडगाव चे माजी तालुका अध्यक्ष तथा पत्रकार सोमनाथ पाटील,तालुका सरचिटणीस अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण लिंडायत, रणजित भोसले,बन्सीलाल परदेशी, प्रदीप कोळी,नितीन महाजन,प्रमोद पाटील,शैलेश अरूण पाटील, सुरेश मराठे,नितीन विठ्ठल महाजन,नकुल पाटील ,रतिलाल पाटील, दादाभाऊ पाटील ,दगडु महाजन .किरण शिंपी , अनिल महाजन, दत्तात्रय पाटील, ज्ञानेश्वर भोसले,सचिन पाटील, प्रशांत कुंभारे,शेखर बच्छाव ,शुभम सुराणा,पुरूशोत्तम पाटील,यांच्या सह भाजपचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button