Amalner

?️ अमळनेर कट्टा..अमळनेर मतदारसंघात 89 पैकी 74  ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा बोलबाला.

अमळनेर मतदारसंघात 89 पैकी 74 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा बोलबाला.

अमळनेर : अमळनेर मतदारसंघात 89 पैकी 74 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा बोलबाला झाला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा 60 व 14 ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा बोलबाला झाला आहे त्यात सर्व विजयी उमेदवारांनी थेट विजयी होत आमदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या आमदार अनिल भाईदास पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, एल टी पाटील, विजय पाटील, डॉ रामु पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रदीप पाटील, सोनु पाटील, भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड यांनी या सदस्यांचा गौरव केला. यावेळी अधिकृतपणे भेट दिलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी आमदार पाटील यांची भेट घेतली.

या सर्व ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे-

राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांचे एकरुखी ग्रामपंचायतींवर 5 जागा मिळवून वर्चस्व मिळवले. सावखेडा येथे राष्ट्रवादी युवक माजी अध्यक्ष अनिल कदम यांचे पॅनल विजयी झाले आहे.

यासह मेहेरगाव, धानोरा, बिलखेडा, हिंगोणे खुर्द, हिंगोणे प्र अ, खर्द, खेडी, फाफोरे बुद्रुक सबगव्हान, जुनोने, रामेश्वर बुद्रुक, गांधली, लोण खुर्द, पिळोदे, सारबेटे खु, वाघोदे, रामेश्वर खुर्द, शिरुड, म्हसले, लोणचारम, गडखांब, अंचलवाडी, धावडे, मांडळ, लोणे, कंडारी, खेडी व्यवहारदडे, पातोंडा, नांद्री, सारबेटे बुद्रुक, सारबेटे खु, मुडी दरेगाव, कुर्हे, पळासदळे, निंभोरा, धुपी, बिलखेडा, कळमसरे, कलाली, सोनखेडी, कळंबू ,बोदर्डे, शहापूर, जळोद, एकतास, तांदळी, ढेकू खुर्द, झाडी, देवळी, हिंगोणे खु , खवशी, दापोरी बु, जवखेडा आदी गावांवर राष्ट्रवादी पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मजल मारली आहे.

महाविकास आघाडीचे पारोळा तालुक्यातील व अमळनेर मतदारसंघातील गावे –
सुमठाणे हिरापूर भोकरबारी भिलाली इंधवे भोलाने, शिरसोदे, रत्नापिंप्री शेवगे शेळावे बु शेळावे खु बोदर्डे, वसंतनगर, आंबपिंप्री, महाळपुर, दळवेल, बहादरपूर, जिराळी, पिंपळकोठें चिखलोड बु, कोळपिंप्री या गावांचे सदस्य 21 पैकी 18 ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button