Champa

सरपंच अतिश पवार यांनी हळदगाव, उटी, चांपा वस्तीत गावोगावी जाऊन गरजूंना केले धान्य किटचे वाटप

सरपंच अतिश पवार यांनी हळदगाव, उटी, चांपा वस्तीत गावोगावी जाऊन गरजूंना केले धान्य किटचे वाटप

अनिल पवार

चांपा: कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गावर संकटाचा सामना करीत आहे. अशा मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळावे, याकरिता चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी हळदगाव, उटी, चांपा वस्तीत गरजूंना अन्नधान्य किटचे वितरण केले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये साबून, तांदूळ, तेल, मीठ, हळद, मिरची पावडर, तूवळडाळ, मसाले आदी दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तूंच्या समावेश आहे.

सरपंच अतिश पवार यांनी अभी नहीं तो फिर कब व जनसेवा आप फाऊंडेशन ग्रुप तर्फे अती आवश्यक गरजूंना मदतीचा हात उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी एकल महिला वयोवृद्ध गरजूंना मोठा आधार ठरत आहेत. यावेळी चांप्याचे सरपंच अतिश पवार, हळदगावचे सरपंच जिजाबाई छापेकर, उटीचे सरपंच अमित पाटील आदींच्या उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button