पेठ

महाराष्ट्र शासनाने पेठ तालुक्यातील आदिवासी शेतरकऱ्याची फसवणूक केली या संदर्भात तहसीलदारांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे निवेदन

 महाराष्ट्र शासनाने पेठ तालुक्यातील आदिवासी शेतरकऱ्याची फसवणूक केली या संदर्भात तहसीलदारांना 
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे  निवेदन 

महाराष्ट्र शासनाने पेठ तालुक्यातील आदिवासी शेतरकऱ्याची फसवणूक केली या संदर्भात तहसीलदारांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे निवेदन

पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
महाराष्ट्र शासनाने पेठ तालुक्यातील आदिवासी शेतरकऱ्याची फसवणूक केली या संदर्भातपेठ तहसीलदारांना 
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे  निवेदन देण्यात आले.
सन 2008 ते 2009 या काळात पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतुन एक लाख आतील कर्ज घेतले होते त्यानंतर आज 2019 ह्या इसवी सन पर्यत महाराष्ट्र शासनाने 2 वेळा सरसकट कर्ज माफी दिली परंतु  आज पर्यत आदिवासी शेतकऱ्यांना कोणताही लाभ  कर्ज माफी मिळाला नाही परंतु पाच  दिवसांपूर्वी  राष्ट्रकृत बँकेने कोर्टामार्फत आदिवासी  शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या आहे  कर्जाबाबत त्या संदर्भात आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा  कार्यध्यक्ष गणेश भाऊ गवळी यांच्या नेतृत्वाखाली आज पेठ तहसीलदार मा संदीपराव भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले  व 
त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या समस्या बाबत  तात्काळ चौकशी करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई सुरू करून लगेच सहकार अधिकाऱ्यांशी फोन वरून चर्चा करून शेतकऱ्यां सोबत चर्चा घडवून आणण्यासाठी वेळ घेतली व  तुर्तात  उद्या पासून उपोषण बसण्यास स्थगिती करावी ही विनंती केली ह्या चर्चा प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ नेते छबिलदास चोरटे ,अशोक मोरे,पांडुरंग मोहरे,सुशीलबाई धूम,पुंडलिक चौधरी, यशवंत मोहरे, मोहनराव वाघमारे, भारत माळगावे,देवराम मोहरे,गिरीधर चौधरी, हिरबाई मोरे, कृष्णा भोये,मोतीराम मोहरे,अंबादास पाडवी,भाऊराव भोये,विष्णू मोरे,नथु खोटरे,गुणाजी मोरे,निवृत्ती पाडवी, हे सर्व शेतकरी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button