Pandharpur

तावशी येथील डाॅक्टरांना मनसेच्या वतीने पीपीई कीट आरोग्य सेविकांना आणि गरजू मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

तावशी येथील डाॅक्टरांना मनसेच्या वतीने पीपीई कीट
आरोग्य सेविकांना आणि गरजू मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील डाॅक्टरांना मनसेच्या वतीने सुरक्षेसाठी पीपीई कीट तर आरोग्य सेविकांना व गरजू शेत मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने मनसेचे सहकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे उपस्थित होेते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक डाॅक्टर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतात. परंतु या डाॅक्टरांना अजूनही सुरक्षेसाठी पीपीई कीट मिळाले नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवा करताना त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे. वैद्यकीय सेवा करताना डाॅक्टरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अलीकडेच शहरातील डाॅक्टरांना सुरक्षेसाठी पापीई किट दिले आहे. त्यानंतर आता ग्रामीण भागातील डाॅक्टरांची गरज ओळखून त्यांनाही पीपीई किट मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार तावशी येथील डाॅक्टरांना पीपीई किट देवून ग्रामीण भागातील या उपक्रमास सुरवात करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आशा वर्कर आणि शेत मजूर याना गहू,तांदुळ, साखऱ, सॅनिटाझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके,ओंकार कुलकर्णी, बाळासाहेब यादव, पोलिस पाटील कविराज आसबे,तलाठी घोगरदरे, डाॅ.साळुंखे,डाॅ.गायकवाड,डाॅ.लवटे,डाॅ.माने, पत्रकार प्रदिप आसबे,अनिल यादव,अमोल कुंभार, प्रा. रवि रणदिवे, प्रा.दत्ता सातपुते आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button