Dhule

आदिवासी समाजाची व समाजातील आद्य क्रांतीकारकांची बदनामी करणे बंद करा.

आदिवासी समाजाची व समाजातील आद्य क्रांतीकारकांची बदनामी करणे बंद करा.

ठोस प्रहार:प्रतिनिधी धुळे, राहुल साळुंके

ABP माझा मराठी वृत्तवाहिनी मार्फत प्रसारित ग्रामदेवता या कार्यक्रमात खान्देशातील व सातपुडा डोंगर परिसरातील एकमेव स्वतंत्र संग्रामातील आदिवासी क्रांतिकारक “क्रांतीवीर खाज्या नाइक” याना “डाकू” म्हणून संबोधुन त्यानी केलेल्या कार्याला व समस्त आदिवासी समाजाला अपमानीत केल्यामुळे ABP माझा चे शिरपूर जिल्हा धुळे येथील स्थानिक व मुख्य संपादक यांच्यावर एट्रोसिटी आँक्ट नुसार गुन्हा नोंदवन्यात यावे म्हणून शिरपुर तालुक्यासह पूर्ण जिल्यात व महाराष्ट्रात निषेद नोंदावत ठीक ठिकाणी आदिवासी समाजामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहेत की, सोशल मीडिया मार्फत वायरल झालेल्या एका ABP माझा न्यूज़ चॅनल च्या चित्रफित मध्ये स्वतंत्रता संग्रामचे आदिवासी क्रांतिकारी ” शाहिद वीर खाज्या नायक” ह्यांना ग्रामदेवता कार्यक्रमात मुम्बई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिजासन माता मंदिराबाबतीत विश्लेषण देताना खाज्या नायक “डाकू” ने मंदिराचे रक्षण केल असे क्रान्तिकारकाना “डाकू” म्हणून उल्लेख करत आदिवसिंच्या इतीहासाला, अस्मितेला व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील आंबापाणीच्या लढाईला बदनाम केल्यामुळे आदिवासी समाज व खाज्या नाइकांच्या अनुयायाच्या मनात रोष व्यक्त होत आहेत आणि खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत वीस वर्षे इंग्रजांचे कर्मचारी म्हणून नोकरी करत होते. आजचे मुम्बई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३च्या सेंधवा बिजासन घाटावरुन प्रवास करणाऱ्या व्यापारी व प्रवाशांचे संरक्षण करण्याचे काम करत होते. दाट जंगलातून जाणा-या बैलगाडया व भारतीय नागरिकांचे संरक्षण करणा-या पोलीस टुकडीचे ते प्रमुख होते. जिम्मेदारी पूर्ण करत असताना त्यांच्या हातून एक लुटारू मारल्या गेल्याने त्यांना दहा वर्षाची कारावास झाली व त्यांना नोकरीतून काढून टाकल्यानंतर १८५५ साली कारावासातुन परत येवून खाज्या नायकांनी इंग्रज सरकारच्या माध्यमातून देश्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची जाणीव झाल्यामुळे व त्याच क्षणापासून इग्रजांविरुद्ध विद्रोह सुरु केले तेव्हा इंग्रज सरकार कडूनखाज्या नायकाना परत नोकरित समावुन घेण्याच्या प्रस्ताव ठुकरुन इंग्रजां विरोधात आवाज बुलंद करत १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात उठावाच्या रक्त रंजित लढाईत आंबापाणीची लढाई लढणा-या महान क्रान्तिकारकांचे इतिहास असताना त्याना “डाकू” म्हणून संबोधणे कितपत योग्य आहेत? देश्याचा चौथा आधारस्तंभ मानले जाणारे वृत वाहिन्यामार्फत असे देश्यासाठी शहिद झालेल्या क्रांतिकारकांची बदनामी होणे म्हणजे खुप मोठी शोकांतिका आहेत म्हणून या पध्दतीने आदिवासी समाजाला विविध मार्गानी बदनाम करण्याचे कार्य तथाकथित विचारधारेचे आहेत, कधी आदिवासी समाजाला नक्षलवादी तर कधी डाकू म्हणून त्यांच्या इतिहासाला मिटवण्याचे कार्य सुरु आहेत तर अश्या घटनेला आढा बसायला पाहिजेत आणि आदिवासी समाजाला अभिमानाने जगु द्यावे,अन्यथा आदिवासी समाज अश्या घटनेचा सदैव विरोध करुन जाब विचारेल.

शिरपुर तालुक्यातील सांगवी पोलिस्टेशन येथे सर्व आदिवासी समाज व विविध आदिवासी सघटना मार्फत निवेदने देण्यात आले तसेच एबीपी माझा मार्फत त्यांच्या चैनल वर माफीनामा जाहिर करण्यात यावे तसेच कार्यवाही न झाल्यास आन्दोलनाचा इशारा देण्यात आला त्यात जय आदिवासी युवा शक्ति महाराष्ट्र (JAYS), आदिवासी टाइगर सेना (ATS), खाज्या नायक मित्र मंडल ट्रस्ट, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, व अखिल महाराष्ट्र आदिवासी बचाओ अभियान चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button