Amalner

शिवशाही फाऊंडेशनचा युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे सन्मान

शिवशाही फाऊंडेशनचा युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे सन्मान

रजनीकांत पाटील

अमळनेर
“शिवशाही फाउंडेशन”ने कोरोना काळात रक्त तुटवडा च्या पार्श्वभूमीवर केलेले रक्तदान शिबीर, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेली जनजागृती तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर ने “सेवाभाव सन्मानपत्र” देऊन नुकतेच सन्मानित केले.

युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेवा निवृत्त प्रा.अशोक पवार, निवड समितीचे अध्यक्ष तथा अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदिप घोरपडे, प्रकल्प प्रमुख तथा निवृत्त केंद्रप्रमुख बन्सिलाल भागवत, टेलिफोन विभागातील निवृत्त कर्मचारी भास्कर बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सन्मान पत्र शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे व सचिव उमेश काटे यांनी स्वीकारले. यावेळी फ्रुटसेल सोसायटीचे संचालक पी.आर.काटे व विमलबाई काटे आदी उपस्थित होते. यावेळी शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, हा सन्मान फक्त आमचा वैयक्तिक नसून शिवशाही फाऊंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभागी सर्व सभासदांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा आहे, हा सन्मान मिळाल्याने पुढील काळात फाउंडेशन समाजपयोगी व सामाजिक कार्य करु असे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button