Pune

ऐतिहासिक बारवेवर दीपोत्सव करत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

ऐतिहासिक बारवेवर दीपोत्सव करत मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

दत्ता पारेकर पुणे

पुणे : स्वराज्यातील पुरातन देसगावडा असणारे हिंगोजीबाबा होळकर यांचे नातू मल्हारराव होळकरांनी आपल्या पराक्रमाने स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्यासाठी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. मल्हारराव होळकर यांनी लाहोरच्या पुढे जावून अटक येथे मराठ्यांचा भगवा ध्वज फडकावला, अशी माहिती आयोजकांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा भगवा ध्वज अटकेपार दिमाखात फडकवणाऱ्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार आणि होळकर सत्तेचे संस्थापक सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त दौंड तालुक्यातील मेरगळवाडी येथील मोरेवस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेची स्वच्छता करण्यात आली. यावेळी 300 दीप लावून अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसारही बारव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली आहे.

दौंड तालुक्यातील महेश्वर युथ फाउंडेशन च्या वतीने मल्हारराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत बारव संवर्धन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याची सुरुवात मेरगळवाडी येथील मोरे वस्ती येथून करण्यात आली. बारव परिसरात वाढलेल्या काटेरी झुडपे, गवत याची स्वच्छता करून 300 दीप लावून मल्हारराव होळकर यांना अभिवादन करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button