धुळ्यात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचा सुळसुळाट
प्रतिनिधी : असद खाटीक
शिरपूर : शिरपूर तालुक्यामधून अवैधपणे जनावरे वाहून नेणार यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे या अनुषंगानेच
शिरपूर तालुका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली होती की मध्यप्रदेश मधून औरंगाबादच्या दिशेने मोठ्या प्रमाणात जनावरे अवैधरित्या वाहनांमध्ये कोंबून नेले जाणार आहेत
या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड येथील चेक पोस्टवर एक पथक तैनात करून नाकाबंदी केली असता या तपासणी दरम्यान माहिती मिळाले वाहन पोलिसांना आढळून आले या वाहनाची तपासणी केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना या वाहनामध्ये तब्बल 97 जनावरं निर्दयतेने कोम्बुन वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले
यासंदर्भात दोघा आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईत जप्त केलेल्या वाहनात आढळून आलेली 97 जनावरं जवळील गोशाळेमध्ये सुखरूप पणे ठेवण्यात आली आहेत
यासंदर्भात शिरपूर तालुका पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून यामागे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.






