राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३ वर असलेल्या समस्यांची आमदार फारूक शाह यांच्याकडून पाहणी. स्थानिकांच्या समस्या महिन्याभरात सोडविल्या नाही तर टोल वसूली बंद पाडणार….
असद खाटीक धुळे
धुळे : धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३ जातो. याच महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून लहान मोठे अपघात होत आहेत. यात चाळीसगाव चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बंद असल्याने दिवसभर होणारी ट्रफिक यातून होणारे वाद विवाद यातून निर्माण होणारा तणाव तसेच सुलतानिया मदरस्या जवळ सर्विस रोड, पथदिवे, गटारी नाहीत. पथदिवे बंद असल्याने काही ठिकाणी पथदिवे नसल्याने तेथे कोरोना बंद काळात झालेला खून, जबरी चोऱ्या, अपघात यासारख्या विविध गुन्हाच्या घटना यामुळे धुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच गुरुद्वारा आणि सुलतानिया मदरसा जवळील दोन्ही सर्विस रोड बाबतच्या महत्वाच्या प्रश्नांवर आणि आयत्यावेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा यावर राष्ट्रीय महामार्ग ३ चे प्रकल्प संचालक श्री. भाऊसाहेब साळुंखे आणि व्यवस्थापक श्री. संजय गुरव यांना वरील सर्व माहिती फोन वरून व पत्र देवून दिली असतांना नागरिकांच्या समस्येबाबत त्यांनी दखल घेतली गेलेली नाही.
वरील बाबतीत नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना आहेत. जास्तीच्या टोल वसुलीमुळे धुळेकर जनतेचा असंतोष झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेत आमदार फारूक शाह यांनी आज व्यवस्थापक श्री. संजय गुरव यांना सोबत घेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३ वर असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर जात पाहणी केली. धुळेकर जनतेच्या स्थानिक खाजगी वाहनाला टोलमधून ८७.५ % सूट आणि मालवाहतूक वाहनाला टोलमधून ७५% सूट देण्यात यावी यावर देखील यशस्वी चर्चा करण्यात आली. यानंतर स्थानिक खाजगी वाहनांना टोलच्या फक्त १२.५ % व मालवाहतूक वाहनाला २५% टोल दयावा लागेल असे यावेळी सांगण्यात आले. वरील सर्व जनतेशी निगडीत असलेल्या समस्या येत्या महिनाभरात सोडविल्या नाही तर तक्रारदारांसह धुळेकर नागरिकांना सोबत घेऊन टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आमदार फारूक शाह यांच्याकडून देण्यात आला. या पाहणी प्रसंगी आमदार फारूक शाह यांच्या समवेत टोलनाका व्यवस्थापक श्री. संजय गुरव, आदिल शाह, डॉ. शाहीद शेख, परवेज शाह, निलेश काटे, आसिफ शाह, युसुफ पिंजारी, जाकीर शाह, मुनावर शाह, सईदभाई बर्तनवाले, रफिक शाह आदी उपस्थित होते.
शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर






