तालुक्यात पावसाची दमदार हजेरी..शेतकरी राजा सुखावला पहा इतक्या पावसाची झाली नोंद..
अमळनेर तालुक्यात काल सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. असह्य उकाडा देखील होत होता.शेतकरी राजा मोठ्या चिंतेत होता.दुबार पेरणीचे संकट समोर ठेपले होते.25% झालेल्या पेरण्या वाया जातात की काय अशी भिती निर्माण झाली होती. तसेच उर्वरित पेरण्यांना देखील उशीर होत होता.परिणामी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पण काल थोडा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.तालुक्यात काल
अमळनेर 37.00 mm, शिरूड- 14.0 mm, पातोंडा – 63.0 mm, मारवड – 12.0 mm, नागाव – 24.0 mm, अंमळगाव- 15.0 mm भरवस – 12.0 mm
वावडे – 14.0 mm
एकूण – 191.0 mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे.






