हुपरी मधील महिलांनी लुटले हळदी कुंकू व वाणासोबतच आरोग्याचे वाण..
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : उर्वी वुमन्स क्लबकडून हळदी- कुंकू व स्नेह मेळाव्याचे आयोजन… उर्वी वुमन्स क्लब हे महिलांच्या कलागुणांना वाव देणारं हक्काचे व्यासपीठ आहे आणि हळदी -कुंकू कार्यक्रमासोबत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन हुपरी शहराच्या प्रथम नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांनी केले. हुपरी येथील अंबाबाई मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त उडान फौंडेशन संचलित, उर्वी वुमन्स क्लब कडून आयोजित हळदीकुंकू समारंभ व स्नेहमेळावा कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी नारी सिद्दी फाउंडेशनच्या अध्यक्षा निधी चेणे, उडान फौंडेशनचे अध्यक्ष, भुषण लाड उपस्थित होते.
उडान फौंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत बेघर, बेवारस, मनोरुग्ण लोकांचे पुनर्वसन यासोबतच गरजू लोकांच्या साठी मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात . महिला सक्षमीकरण हा विषय फक्त प्रबोधनात्मक न ठेवता तो सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांच्या हाताला काम मिळावं, युवतींना स्वरक्षणासाठी प्रशिक्षण मिळावं, महिलांच्या कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने उडान फौंडेशनच्या माध्यमातून उर्वी वुमन्स क्लब ची सुरुवात करण्यात आली आहे..
या कार्यक्रमाच्या वेळी नारी सिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्षा निधी चेणे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व महिलांना त्यांच्या मार्फत सँनीटरी पॅड चे वाटप करण्यात आले.. या कार्यक्रमासाठी हुपरीतील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात हळदी – कुंकू कार्यक्रमासोबतच उडान फौंडेशनचे सदस्य प्रतिष गायकवाड यांच्या मार्फत गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले. महिलांसाठी विविध स्पर्धा विविध खेळांचे ही आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धा व खेळामुळे सर्व महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष भुषण लाड, उर्वी वूमन्स क्लबच्या सचिव सारिका पाटील, सोनाली पारखे, श्रद्धा औंधकर, वैशाली कोथळे, वेदिका मांडवकर, कोमल इंगरोळे, अंकिता रणवारे, लता शिंगे, संचालिका संजीवनी दळवी, रेखा उगवे, सोनाली राजपूत, प्रतिष गायकवाड आदी उपस्थित होते.






