Chalisgaon

पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार – किशोर पाटील ढोमणेकर

पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार – किशोर पाटील ढोमणेकर

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा पक्ष असून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब व अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महाशक्तीच्या दिशेने होत आहे. मी देखील विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक होतो. मात्र राज्य व केंद्राच्या समितीने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकटमोचक नामदार गिरिषभाऊ महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाने या विधानसभा निवडणुकीत साठी श्री मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाने घेतलेला निर्णय प्रामाणिकपणे मान्य केला असून कुठलीही अपेक्षा न ठेवता यापुढे पक्षाचे निष्ठेने काम करणे ही माझी जबाबदारी आहे. राष्ट्र प्रथम, नंतर आपण या राष्ट्राच्या उभारणीसाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे.या तत्त्वाला धरून पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार असून मंगेश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर करीत आहे, त्यांच्या विजयासाठी तालुकाभर प्रचार कार्यात सहभागी होऊन विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ असे प्रतिपादन चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार किशोर पाटील ढोमणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील व मंगेश चव्हाण हे उपस्थित होते. डॉक्टर संजीव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भाजपा पक्ष हा किशोर पाटील ढोमणेकर यांच्यासारख्या निष्ठावंत व पक्षाला बांधील असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालेला आहे. किशोर पाटील यांनी घेतलेली भूमिका याचे आम्ही स्वागत करतो व त्यांच्या भूमिकेला अनुसरून योग्य ती जबाबदारी विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान त्यांना देण्यात येईल.
यावेळी मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, पक्षाने मला जरी टिकीट दिलेले असल, संधी दिलेली असली तरी सर्व इच्छुक उमेदवार जे माझ्या सोबत आहेत तेच खऱ्या अर्थाने या विधानसभेतील नायक असतील. किशोर पाटील हे जनतेच्या सेवेसाठी, चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी माझ्यासोबत आलेत त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी भाजपाला विजयी करण्याचा जो संकल्प किशोर पाटील यांनी बोलून दाखवला ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button