Pune

हर्षवर्धन पाटील यांना “गुड न्यूज “मिळणार

हर्षवर्धन पाटील यांना “गुड न्यूज “मिळणार

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा होणारा पश्चाताप लवकरच दूर होणार असून पाटील यांची भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्यसभेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. त्याच वेळी विधान परिषदेच्या जागांचीही रणधुमाळी सुरू होणार आहे. विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयच्या नऊ जागांवरील विधान परिषद सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यात सध्या भाजपकडील तीन सदस्य निवृत्त होतील. यात सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार जण विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात.

यात चार जागांपैकी तीन जागांवर निष्ठावंत आणि एका जागेवर पक्षात नव्याने आलेल्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. यात पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्याने सांगितले. या नेत्याच्या म्हणण्यानुसार पाटील हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे बारामतीतील संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांना योग्य पदावर आता संधी देणे गरजेचे आहे. माजी मंत्री असलेले पाटील हे 1995 मध्ये प्रथम अपक्ष आमदार म्हणून इंदापूरमधून निवडून आले. ते तत्कालीन शिवसेना-भाजपच्या मंत्रिमंडळात होते. काही काळचा अपवाद वगळता ते 2014 पर्यंत सलग मंत्रिमंडळात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काॅंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. तरी 2019 मध्येही त्यांचा पराभव झाला. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवायचे आहेत. त्यासाठी इनकमिंग केलेल्या नेत्यांना संधी देण्याशिवाय पर्याय नसल्याने पाटील हे लवकरच विधान परिषदेत दिसू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button