खिर्डी येथील ग्रा.वि.अधिकारी यांची कामाचे इष्टीमेंट देण्यास टाळाटाळ…
खिर्डी/प्रतिनिधी भिमराव कोचुरे
मौजे खिर्डी बु ता.रावेर शाकंबरी माता मंदिर परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स चे दुरूस्ती वरती होत असलेल्या कामाचे इष्टीमेंट चा मागणी अर्ज दि.12 ऑगस्ट 2020 रोजी ग्रा.वि.अधिकारी ग्रा.प.खिर्डी बु.यांचेकडे सादर केलेला होता परंतु सदर एक महिना होऊन सुद्धा ते देण्यास टाळाटाळ करीत आहे व त्यांच्याकडून सांगितले जात आहे की पंचायत समिती तथा इंजिनिअर यांसकडून माझ्याकडे इष्टीमेंट तयार करून आलेलेच नाही.
सविस्तर असे की कामाची वर्क ऑर्डर निघाली असून काम हे प्रगतीपथावर आहे व सद्यस्थितीत काम हे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतांना देखील इष्टीमेंट तयार झालेले नाही तर हे काम निकृष्ठ दर्जाचे होईल कारण कोणत्याही प्रकारची गाईडलाईन नसतांना सदर काम होत आहे तसेच इष्टीमेंट तयार असेल व ते ठेकेदार किंवा ग्रामपंचायतिला प.समिती कडून मिळालेलं असेल तर ग्रा.प.देण्यास टाळाटाळ का.?करीत आहे.
याचे कारण कामाचा दर्जा निकृष्ठ असल्यानेच ग्रा.प.अर्थात ग्रा.विकास अधिकारी इष्टीमेंट देण्यास टाळाटाळ करीत आहे तरी कामाचे इष्टीमेंट मिळावे व काम हे अंदाजपत्रकानुसार झालेलं आहे किंवा नाही यांचीही चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया अर्जदार यांनी मा.गटविकास अधी.प.स.रावेर यांना तक्रारअर्ज सादर केल्यानंतर ठोस प्रहार प्रतिनिधी शी बोलतांना माहिती दिली.






