Pune

? कडेकोट संचारबंदीत. हॅपी न्यू इयर

? कडेकोट संचारबंदीत. हॅपी न्यू इयर

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी दरवर्षी पुणेकरांमध्ये मोठा उत्साह असतो. शहरातील फर्गसन रस्ता, कॅम्प परिसरातील एमजी रस्ता तसेच अन्य काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत विशेषत: तरुणाईची तुफान गर्दी असते. यावेळी मात्र हा उत्साह पहायला मिळाला नाही. संचारबंदीच्या नियमांमुळे यंदा घरच्या घरीच सेलिब्रेशन करण्यात आले.
करोना संसर्गाचा धोका व नवीन करोनाचे घोंगावत असलेले संकट यामुळे राज्य सरकारने नवीन वर्षाचे स्वागत आणि थर्टी फर्स्ट साधेपणाने करण्याची सक्‍त सूचना केली आहे.

त्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच पालिका क्षेत्रांत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे.
याशिवाय 31 डिसेंबरसाठी विशेष गाइडलाइन्सही जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यात अनेक सूचना व निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे.
रात्री 11 वाजता संचारबंदी सुरू झाल्यानंतर 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत. याशिवाय रात्री 11 नंतर रेस्टॉरंट, बार, पब येथे पार्टी करण्याची परवानगी नसेल.त्यामुळेच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन रात्री 11 वाजताच आवरतं घ्यावं लागणार. अशा विविध नियमांचे निर्बंध आल्यामुळे बाहेर जाऊन सेलिब्रेशन करण्याऐवजी नागरिकांनी घरीच राहण्यास पसंती दिली.
त्यामुळे रात्री अकरानंतर शहराच्या रस्त्यांवर अतिशय तुरळक गर्दी होती. तसेच रस्त्यांवर पोलिसांचाही कडक बंदोबस्त दिसून आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button