Chimur

चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केले शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणी पोलिसांचे अभिवादन.

चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केले शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणी पोलिसांचे अभिवादन.

कोणत्याही प्रकारच्या मदतीची दाखविली तयारी.

ज्ञानेश्वर जुमनाके

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने जगभरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. भारतातही ही संख्या अतिशय जलद गतीने वाढत असतांना दिसत आहे. हे संक्रमण कमी करण्यासाठी शासनाने सर्व जनतेला काही दिवसांसाठी घरी थांबण्यास सांगितल्यामुळे रस्ते व कार्यालये निर्जन झाले आहेत. अश्यातच जीवाची पर्वा न करता शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट आणी पोलीस दिवसरात्र लोकांची सेवा करीत आहेत. त्यांच्या या सेवेला चिमूर विधानसभेत प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी शासकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणी पोलिसांची भेट घेवून अभिवादन केले आणी लोकहिताची ही जबाबदारी हाताळतांना आपणास कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास आम्ही आम आदमी पार्टी चे सर्वे स्वयंसेवक आपणास मदत करण्यास इच्छुक आहोत अश्या प्रकारची तयारी दर्शविली.

या प्रसंगी आम आदमी पार्टी चे सुरेशजी कोल्हे, आदित्य पिसे, देवराव गायधनी, पुष्पाताई गोल्हर, लीना म्हस्के, महादेवराव कोपुलवार, मंगेश शेंडे, विशाल इंदोरकर, रुपेश घोनमोडे, समिधा भैसारे, पराग वाळके, सुदर्शन बावणे, रामभाऊ नान्हे, जयंत कामडी, जावेद पठाण, विलास मोहीनकर, सुनील गजभिये, विशाल ढोके, रतन पालवासनिक, संजय केजिक, अतुल खोब्रागडे यांनी कार्यालयाची शिस्त पाडून लेखी स्वरुपात सर्वांचे अभिवादन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button