Indapur

कांदलगाव मध्ये स्वच्छता सप्ताहाचे आयोजन ! गट विकास अधिकारी घेणार प्लास्टिक कचरा विकत.

कांदलगाव मध्ये स्वच्छता सप्ताहाचे आयोजन ! गट विकास अधिकारी घेणार प्लास्टिक कचरा विकत.

पहिल्या दिवशीचा प्लास्टीक कचरा इंदापूरचे गटविकास अधिकारी श्री.विजयकुमार परीट स्वतः विकत घेणार आहेत.कांदलगाव ग्रामपंचायतीने प्लास्टीक बंदीच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे.अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर गावांनी आदर्श घेण्यासारखे आहे,असे मत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे– इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती गाव स्वच्छता सप्ताहाची सुरुवात करून साजरी करण्यात आली.सरपंच रविंद्र पाटील यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पहिल्या दिवशीचा प्लास्टीक कचरा इंदापूरचे गटविकास अधिकारी श्री.विजयकुमार परीट स्वतः विकत घेणार आहेत.कांदलगाव ग्रामपंचायतीने प्लास्टीक बंदीच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे.अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर गावांनी आदर्श घेण्यासारखे आहे,असे मत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की,संत गाडगे महाराज हे एक आधुनिक विचारांचे संत होते.त्यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र सर्वच गावांनी अंगिकारला तर स्वच्छतेतुन शाश्वत विकास होण्यास मदत होईल.माजी जि.प.सदस्या ॠतुजा पाटील आणि ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्या संकल्पनेतून प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्लास्टीक संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले.त्याकरिता प्रथम महिला सभा घेवून महिलांना ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचे महत्व आणि फायदे पटवून देण्यात आले.संकलित केलेले प्लास्टीक पुनःप्रक्रियेसाठी टेंभुर्णी एमआयडीसीतील प्रकल्पाला देण्यात येणार आहे,अशी माहिती सरपंच रवींद्र पाटील यांनी दिली.

यावेळी उपसरपंच कमल राखुंडे,सदस्या रेखा बाबर,तेजमाला बाबर,कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे,ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील,किसन सरडे,बाळू गिरी,विजय सोनवणे,दशरथ बाबर तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष बाबर व राजु मदने यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button