तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील नूतन बसस्थानकाचे सप्टेंबर 2020 अखेर भूमिपूजन
कृष्णा यादव,अक्कलकोट प्रतिनिधी :-
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. सदर निधी मिळविण्याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बैठक लावून पाठपुरावा केला होता. सदर निधी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अक्कलकोट तालुका व त्यातून समाधान व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट वासियांचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बस स्थानकाचे नूतनीकरणासाठी मोठ्या निधीची गरज होती. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अक्कलकोट बस स्थानका करिता पाच कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. अक्कलकोट बस स्थानकांचे दुरावस्था, परगावाहून येत असलेल्या लाखो भाविकांचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक राजेंद्र जंवजाळे यांच्यासोबत अक्कलकोट बस स्थानकाचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्यात आलेले होते.
सदर कामाची तिरंग्यावर विचारणा करून तात्काळ काम मार्गी लावण्यासाठी शिफारस केले नाही या कामाचे तांत्रिक बाबी मार्गी लागून सप्टेंबर 2020 कामास प्रारंभ करण्याचे आश्वासन जवंजाळे यांनी दिले आहे अक्कलकोट बस स्थानक लवकरच कात टाकून अद्यावत होणार असल्याने शहर व तालुकावासियांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जंवजाळे, आर्किटेक्चर वरूण देगावकर , बाळा शिंदे आदीजण उपस्थित होते.






