Kolhapur

गोकूळ दूध संघाच्या मल्टिस्टेटचा निर्णय अखेर रद्द

गोकूळ दूध संघाच्या मल्टिस्टेटचा निर्णय अखेर रद्द अध्यक्ष रविंद्र आपटे यांची माहीती

कोल्हापूर ःप्रतिनिधी आनिल पाटील

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ) या संघाच्या मल्टिस्टेटचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असल्याची माहीती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी पत्रकारांशी बोलतानां दिली.

आज संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आमदार पी एन पाटील ” माजी आमदार महादेवराव महाङीक ‘ संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्यामध्ये झालेल्या बँठकित हा निर्णय घेण्यात आला. गेली वर्षभर संघाच्या मल्टिस्टेटचा विषय गाजत होता. तर आमदार सतेज पाटील यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामूळे हा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसांनी या संघाची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत हा विषय पटलावर ठेवण्याचा निर्णय झाला. बाजारपेठेतील गोकूळची विश्र्वासहर्ता””” त्यामूळे निर्माण झालेली दूध आणी दूग्धजन्य उत्पादनांची वाढती मागणी यासाठी दूधाचे संकलन वाढविण्याची आणीबाजारपेठेचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा विचार करून गोकूळ मल्टिस्टेट विषय दूध उत्पादक शेतकरी आणी दूध संस्थांच्या भावना लक्षात घेवून सेंट्रल रजिस्टारकङे नोंदणीकरीता पाठविलेला प्रस्ताव सध्या रद्द करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेली वर्षभर गोकूळ मल्टिस्टेट करण्यावरून जिल्ह्याचे राजकारण तापले होते. या निर्णयामूळे उत्पादकासह संस्थांचे नूकसान होत असल्याचा मूद्दा पूढे करत सूरूवातीला आमदार सतेज पाटील यांनी या विरोधात जिल्ह्यात रान पेटविले होते. लोकसभा आणी विधानसभेच्या निवङणूकीत हा मूद्दा गाजला होता. नंतर संचालक मंङळातही या विरोधात जेष्ठ संचालक अरूणकूमार ङोंगळे यांनी आवाज उटविला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button