Chalisgaon

आठ दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास रयत सेना तीव्र आंदोलन छेडणार

चाळीसगाव शहरातील अवैध धंदे बंद करण्याची रयत सेनेची मागणी –

चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन

आठ दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास रयत सेना तीव्र आंदोलन छेडणार

मनोज भोसले

चाळीसगाव – चाळीसगाव शहरात गेल्या वर्षभरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे हिरापुर रोड वरील सोशल क्लब वर एलसीबी पथकाने छापा मारून जुगार खेळणाऱ्यांना अटक केली होती तर शहरातील बस स्टँड जवळील कॉम्प्लेक्समध्ये तब्बल दोन वेळा एलसीबी पथकाने छापा मारून अनेक जुगाऱ्याना अटक केली होती चाळीसगाव शहरात अनेक जुगाराचे क्‍लब ,गावठी दारू विक्रीचे केंद्र शिवाय हात गाड्यावर देशी दारू खुलेआम विक्री होत असुन त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून व्यसनामुळे अनेक जणांना गंभीर आजार होऊन त्यांचे संसार उध्वस्त होत असल्याने आठ दिवसात अवैध धंदे बंद न झाल्यास रयत सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील वर्षात गांजा विक्री सारखे गंभीर गुन्हे चाळीसगाव सह परराज्यात दाखल झाले आहेत त्यातील आरोपी हे चाळीसगावचे असल्याने त्याचे धागेदोरे चाळीसगावात आहेत. त्यामुळे शांतताप्रिय असलेले शहर गांजाचे माहेरघर असल्याची बदनामी राज्यभरात झाली आहे .तसेच राज्यात गुटखा बंदी असताना चाळीसगाव शहरात उघडपणे गुटखा विक्री होत आहे. यासह मागील काळात नकली देशी दारूचे कारखाने देखील चाळीसगावात असल्याचे उघड झाले आहे . अनेक ठिकाणी पानटपऱ्या व दुकानाच्या आडोशाला बस स्टॅंड च्या मागे खुलेआम कल्याण मुंबई नावाचा मटका (सट्टा ) घेतला जात आहे त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून व्यसनामुळे अनेक जणांना गंभीर आजार होऊन त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत, म्हणून चाळीसगाव शहरातील जुगार, सट्टा ,मटका ,नकली दारू, गांजा यासारखे अवैध धंदे तात्काळ बंद करून चाळीसगाव शहराचा सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा या अवैध धंद्यांमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागण्याची शक्यता आहे म्हणून आठ दिवसात चाळीसगाव शहरातील अवैध धंदे बंद करावे अन्यथा रयत सेनेच्या वतीने पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेटले जाईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे शहर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री .म रा ,मुंबई ,,गृहमंत्री. म रा , मुंबई, पालक मंत्री ,जळगाव ,पोलीस अधीक्षक, जळगाव ,जिल्हाधिकारी, जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव,उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव,प्रांताधिकारी चाळीसगाव ,तहसीलदार ,चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , जिल्हाध्यक्ष संजय कापसे ,शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील ,तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील ,शहर कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर , शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे , जयदीप पवार, विजय जगताप ,दीपक जगताप , समाधान पाटील ,दीपक देशमुख, सतीश निकुंभ ,जितेंद्र कोल्हे ,चेतन निकुंभ, भावेश जाधव, दिपक मोरे ,अजय मोरे ,शुभम पाटील, विलास पाटील ,विकास पवार ,अनिल पाटील ,योगेश पाटील अदि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button