कुरणी ग्रामपंचायत कडून औषध फवारणी –
कोल्हापूर (कागल) – तुकाराम पाटील –
कागल तालुक्यातील कुरणी ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे . कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने औषधाची फवारणी गावातील प्रत्येक वार्ड – गल्ली ठिकाणी करण्यात आली. तसेच गावामध्ये संपूर्ण लॉक डाऊन आहे, मुरगुड पोलीस ठाणे आपले सेवा योग्यप्रकारे बजावत आहे , त्यांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे, गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी दुकानदारांना व भाजी विक्री करणाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिले आहे. त्याचे पालन सर्वजण करत आहेत. यावेळी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






