Dhule

चाकडु येथे जागतिक डॉक्टर्स दिवसानिमित्त लसीकरण शिबिरात डॉक्टरांकडून समुपदेशन.

चाकडु येथे जागतिक डॉक्टर्स दिवसानिमित्त लसीकरण शिबिरात डॉक्टरांकडून समुपदेशन.

राहुल साळुंके धुळे

धुळे : १ जुलै जागतिक डॉक्टर्स दिवस साजरा होत आहे. ह्याचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत उपकेंद्र कोडीद अंतर्गत येणारे चाकडु येथील अंगणवाडीत गरोदर माता व बालक ह्यांचे नियमित लसीकरण शिबिरात अत्यंत प्रसन्न वातावरणात उपस्थित डॉक्टरांनी एकमेकांना जागतिक डॉक्टर्स दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व तद्नंतर प्रमुख म्हणून उपस्थिती असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.नीलिमा देशमुख ह्यांनी आदिवासी क्षेञातील उपस्थित उपस्थित गरोदर माता ह्यांना अत्यंत सोप्प्या व सहज समजेल अश्या भाषेत ग्रामीण भागात गरोदरपणात घ्यावयाची काळजी व गर्भनिरोधक साधने ह्यांच्या वापर ह्या काळजीमुळे व वापरामुळे मानवी जीवनात होणारे फायदे व बदल तसेच आदिवासी बहुल ग्रामीण भागात भविष्यात होणारे बदल व फायदे व तसेच ग्रामीण भागातील वरील गोष्टींमुळे, गैरसमजामुळे होणारे नुकसान ह्याबद्दल गरोदर मातांशी प्रत्यक्ष संवाद साधून सखोल मार्गदर्शन केले.
तसेच उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांना समजेल असे आपल्या मातृभाषेत उपस्थित गरोदर मातांना वरील सखोल मार्गदर्शन व गरोदर मातांना महत्वपूर्ण आरोग्यविषयक व गरोदरपणात घ्यावयाची काळजी ह्याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
ह्यावेळी उपकेंद्र कोडीदचे आरोग्य सेविका पी.ए.गिरासे, आरोग्य सेवक नेटके, गटप्रवर्तक ज्योती पावरा, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक, गरोदरमाता महिला बालकमाता उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button