Pune

भारत देशात प्रथमच विश्व मुलनिवासी दिवस आँनलाईन सेलिब्रेशन सहभागी व्हा – डाँ. निलेश परचाके यांचे अहवान

भारत देशात प्रथमच विश्व मुलनिवासी दिवस आँनलाईन सेलिब्रेशन सहभागी व्हा – डाँ. निलेश परचाके यांचे अहवान

पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

भारतातील आदिवासींची पहिली राष्ट्रीय सांस्कृतीक ऑनलाइन पारंपरिक नृत्य व फोटो स्पर्धा दि.15/ 8/2020 रोजी अनुसूचित जमातीच्या संस्कृती, परंपरा,वेशभूषा, रीतिरिवाज यांच्या संरक्षण आणि संवर्धन व प्रचार प्रसारासाठी हे धेय साधुन aborigine या समाजिक संस्थेकडून ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
या स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार 5000 रुपये , द्वितीय पुरस्कार 3000रुपये, तृतीय पुरस्कार 2000 रुपये ठेवण्यात आले असून अ गटात वय वर्षे 5 पर्यंत ब गटात 5 ते 17 वर्ष क गटात 18 वर्षावरील अश्या तीन विभागात ठेवण्यात आली आहे .सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून आदिवासी लोक सहभागी होत असून इछुक स्पर्धकानी 13 ऑगस्ट 20 पर्यंत [email protected] या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिकच्या माहितीसाठी कु सुवर्णा खाडे मो.नं 9325289653 व धनंजय पिचड मो नं 8104875584 संपर्क साधावा.असे अहवान करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना मा. के. सी. पाडवी, तसेच विधानसभा उपाध्यक्ष मा नरहरी झिरवळ हे उपस्थित राहणार आहेत. तर चला मित्रांनो स्वामील व्हा आपल्या आदिवासी संस्कृतीचे कलेचे प्रदर्शन करण्याकरिता… येत आहे “जागतिक आदिवासी दिनांनिमित्त आपल्या हक्काचा aborigine फेस्टीवलमध्ये सहभागी होऊन आपले ससंस्कृतीक अस्तित्व दाखवता येईल. असे माहिती डाँ निलेश परचाके यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button