कोरोळी गावातील पारधी वस्तीत शिरले पुराचे पाणी
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती – बारामती तालुक्यातील नारोळी- कोरोळी गावामध्ये ओढया शेजारी पारधी समाज्याची वस्ती आहे त्याठिकाणी शुक्रवारी(24) जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे तेथील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले त्यामुळे ओढयाचे पाणी पारधी समाज्याच्या लोकांच्या घरात शिरले त्यामुळे त्या लोकांची अक्षरशः तारांबळ उडाली.
जोरदार पावसाचे आगमन झाल्या कारणाने लाईट गेली असल्याने त्याठिकाणी अंधार झाला होता त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व पाणी लोकांच्या घरात शिरले त्यामुळे पारधी वसाहतीतील लोकांचे आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे.
अन्न -धान्य,जीवनापयोगी वस्तू,कपडे-लता व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या लोकांना रात्र अक्षरशः पाण्यात व अंधारात काढावी लागली.पारधी वसाहतीतील लोकांना आत्ता प्रशासकीय मदत कधी मिळेल अश्या आशेवर बसून आहेत.






