Pune

? Big Breaking..अखेर आदिवासी संघटनांच्या दणक्याने भारती सिंग यांनी आदिवासी समाजाची मागितली जाहीर माफी

अखेर आदिवासी संघटनांच्या दणक्याने भारती सिंग यांनी आदिवासी समाजाची मागितली जाहीर माफी

पुणे प्रतिनीधी -दिलीप आंबवणे

कलर्स टिव्ही वरील “खतरा खतरा खतरा” या एका टिव्ही शोमध्ये श्रीम. भारती सिंग यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृती केल्याविरोधात विविध आदिवासी संघटनांनी तक्रार व निवेदन देऊन विरोध दर्शवला होता.अखेर वाढता विरोध बघून भारती सिंग यांनी दिनांक 06/10/2020 रोजी कलर्स टिव्ही च्या माध्यमातून आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. “माननीय दर्शको!खतरा खतरा शो के दरम्यान आदिवासी शब्दसे किसी जाती परजाती या धर्म के लोगो की भावनाओं को ठेस पहूंची हो तो मै माफी मांगती हू! किसी भी जाती को ठेस पहूंचाना मेरा उद्देश नही था !”असे भारती सिंग यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. बिरसा क्रांती दल संघटनेचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी सर्वात पहिले तक्रार दाखल केली होती.त्याचबरोबर मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालय मंञालय मुंबई,मा. उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय मंञालय मुंबई,मा.गृहमंञी,गृहविभाग मंञालय मुंबई,मा.आदिवासी विकास मंञी, आदिवासी विकास विभाग मंञालय मुंबई,माहिती व प्रसारण मंञी,माहिती व प्रसारण मंञालय मुंबई, मा.पोलीस महासंचालक,पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई , मा.पोलीस अधिक्षक,पोलीस अधिक्षक कार्यालय जेल रोड रत्नागिरी इत्यादींना बिरसा क्रांती दल तर्फे निवेदन देण्यात आली होती.
श्रीम.भारती सिंग (मुळ पत्ता -अमृतसर, पंजाब ) यांनी खतरा खतरा खतरा या कलर्स टिव्ही वरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून “ये आदिवासी लोगही ऐसा कच्छा पहनते होंगे! ऐसावाला!” अश्लील कृती करत
जातीवाचक अपशब्द वापरून हसत कृती केली होती. भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.आदिवासी समाज नाराज झाला होता. तिच्या गैरकृत्याविरोधात सर्व आदिवासी संघटना यांनी तक्रार व निवेदन देऊन तसेच रस्त्यावर उतरून जाहीर निषेध नोंदवला होता. श्रीम.भारती सिंग यांच्या कलर्स टिव्ही वरील खतरा खतरा खतरा हा शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. श्रीम. भारती सिंग व संपादक कलर्स टिव्ही यांच्या वर अनुसूचित जाती व जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम अॅक्टनूसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. अन्यथा संपूर्ण आदिवासी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.याची नोंद घ्यावी. असा इशाराही दिला होता.
यात बिरसा क्रांती दल महाराष्ट्र, जय आदिवासी युवा शक्ती ( जयस) जळगाव, आदिवासी विद्यार्थी संघ नागपूर, एकलव्य आदिवासी युवा संघ, तळोदा, के ए ग्रूप, आदिवासी एकता परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन , आदिवासी एकता परिषद, आदिवासी एकता संघर्ष समिती, गोंडवाना गणतंञ पार्टी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद इत्यादी आदिवासी संघटनांचा समावेश होता.
भारती सिंग यांनी माफी मागितली असली तरी त्यांना आम्ही माफ केले नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आपण पोलीस ठाण्यात पाठपुरावा करणार आहोत. आदिवासी समाजाबद्धलचे हे विचिञ प्रकार थांबले पाहिजेत. म्हणून समाजकंटकांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया तक्रारदार सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सर्व आदिवासी संघटनांनी एकजूट दाखविल्याबद्धल आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button