Pune

जागतिक आदिवासी दिन गावागावात साजरा

जागतिक आदिवासी दिन गावागावात साजरा

पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

जागतिक आदिवासी दिन आदिवासी भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला करुणा या आजारामुळे मोठ्या संख्येने लोक गोळा न करता प्राथमिक स्वरूपात हा दिवस साजरा केला आंबेगाव जुन्नर खेड मावळ या तालुक्यातील गावागावांमध्ये महामानव बिरसा मुंडा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकरी, तंट्या भिल अशा महामानवांना पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

आंबेगाव तालुक्यात फुलवडे येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच कातकरी बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली. तसेच नाव्हेड, तिरपाड, राजपूर गाडेवाडी, जांभोरी नांदुरकीचीवाडी, सावरली, कोंढवळ, आंबेदरा, घोडेगाव याठिकाणी साजरा केला
जुन्नर तालुक्यात शिवनेरीच्या पायथ्याला आदिवासी प्रबोधनी संस्था आवारात काही ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा केला तसेच घाटघर, चांवड, खिरेश्वर, खुबी, तांबे, इंगळून, शिवली, कोपरेमाडवे, हातवीज याठिकाणी फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मावळ तालुक्यात तळपेवाडी, बेलज, खांडी, वडेश्वर, कुसवली या ठिकाणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने दहावी-बारावीच्या 80 टक्के याच्यावर गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी गुलाबाचे फुल देऊन घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला
खेड तालुक्यांमध्ये वाडा, साकुर्डी, धामनगाव, आव्हाट, नायफड याठिकाणी जागतिक आदिवासी दिवस दिवस साजरा करण्यात आला.

आदिवासी समाजातील विविध संघटना, आदिवासी अधिकार मंच, बिरसा क्रांती दल, आदिवासी कृती समिती, आदिवासी उत्कर्ष संघ हतवीज, आदिवासी प्रबोधनी संस्था जुन्नर, आदिवासी आदिम संस्था, आदिवासी शास्वत संस्था जुन्नर, आदिवासी विकास मंडळ घोडेगाव अशा विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button