Aurangabad

? ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा

? ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : एमपीएससी मेन्स पास झालेला विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली.

त्या घटनेचा निषेध करण्यासाठी ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले चौक येथे एकत्रित येत घोषणाबाजी करत आंदोलन केले.

तसेच स्वप्नीलचा व्यवस्थेने बळी घेतला असून ठाकरे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महेंद्र मुंडे यांनी केली.

त्यांतनर ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारला तीव्र इशारा देण्यात आला व खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने महराष्ट्रभर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा कृती समितीचे,राज्य समन्वयक, महेंद्र मुंडे यांनी दिला.

या आहेत प्रमुख मागण्या
1 MPSC संयुक्तगट ब पेपर ची तारीख जाहीर करणे.
2 MPSC संयुक्त ग्रुप गट क जाहिरात काढणे.
3 MPSC मधून निवड झाल्याल्याना त्वरित नियुक्ती देणे.
4 आरोग्य सेवकांचा निकाल त्वरित लावणे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button