भागशाळा कोपर्डे येथे रंगली काव्यमैफल – –
कोल्हापूर – तुकाराम पाटील (प्रतिनिधी) –
श्रीराम हायस्कूल भागशाळा कोपर्डे, ता. करवीर , कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बाल काव्य संमेलन यामध्ये 25 ते 30 विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले . या बाल काव्य काव्य संमेलन व ग्रंथप्रदर्शन सोहळ्याचे शुभारंभ मा. जयंत आसगावकर ( सचिव सांगरूळ शिक्षण संस्था) यांच्या शुभ हस्ते झाले.या काव्य संमेलनास प्रमुख कवि म्हणून श्री जगजीत महावंश (अध्यक्ष सह्याद्री साहित्य मंच गगनबावडा) व विक्रम राजवर्धन (प्राध्यापक राजाराम महाविद्यालय कोल्हापूर) म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. परशुराम कांबळे (सचिव सह्याद्री साहित्य मंच) व श्री. सातपुते सी.एम. (मुख्याध्यापक) उपस्थित होते. शेत-शिवार, आई – वडील व प्रेम आदी विषयावर अनेक कविता सादर करण्यात आल्या. यावेळी प्रमुख मान्यवरांनी कवितांचा आकृतिबंध याविषयी मार्गदर्शन केले. हा सोहळा दोन ते तीन तास चालला. या रंगलेल्या काव्य संमेलनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत श्री. भगारे ए. के. यांनी केले आणि आभार सण गर सर यांनी मांडले.






