Chimur

कामठी येथील पिडीताला शासनाने आर्थिक मदत करावी चिमूर क्रांती नाभिक समाज तालुका संघटनेची मागणी

कामठी येथील पिडीताला शासनाने आर्थिक मदत करावी
चिमूर क्रांती नाभिक समाज तालुका संघटनेची मागणी

तहसीलदार चिमूर यांना निवेदन सादर

चिमूर/प्रतिनिधी – ज्ञानेश्वर जुमनाके

नागपुर जिल्ह्यातील कामठी शहरात दाढी करण्याच्या किरकोळ कारणावरून सलून व्यावसायिकावर ३ ते ४ जणांनी मारहाण केली. यात सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाला. याचा संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज व सलून पार्लर असोसिएशनने जाहीर निषेध करीत आहे. नाभिक समाजाला अँट्रासिटी कायदा लागू करून सरक्षण देण्यात यावे. मारेक-यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच कामठी येथील पिडीताला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे चिमूर क्रांती नाभिक समाज संघटनेनी चिमुरचे तहसीलदार संजय नागतीलक यांचेकडे सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदन सादर करण्या-या शिष्टमंडळात चिमूर क्रांती नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष सुरज पुंड, उपाध्यक्ष अरमान बारसागडे, अनिल मेंडूलकर, सचिव अक्षय लांजेवार, सहसचिव अमित चिंचूलकर, विलास पुंड, नरेश सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, सुनील कडवे, सुधाकर मेंडूलकर, नितीन लांजेवार, रणजीत चांदेकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button