अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी-मा. आ.स्मिता वाघरजनीकांत पाटीलअमळनेर-तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.नुकसान भरपाई चे अनुदान तातडीने वितरित करण्यात यांवे अशी मागणी मा. आ.स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्या कडे केली.
तालुक्यात मागील वर्षी सुमारे मारवड,वावडे,अमळगांव,पातोंडा ह्या महसूली मंडळातील 52 गांवामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती.ह्या अतिवृष्टित सुमारे 19413.26 हेक्टर जमिनीवरील शेती पिकांचे व फळ पिकांचे नुकसान झाले होते.राज्य विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशन कालावधीत मा. आ.स्मिता वाघ नुकासन ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली होती.अद्यापही आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नसल्याने मा. आ.स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे इ-मेल द्वारे नुकसान भरपाई मिळन्याची मागणी केली.
दरम्यान लवकरच मदत वितरित करण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषि मंत्री ना.दादा भुसे यांनी आश्वासन यांनी दिले आहे






