Amalner

? शेतकऱ्यांची पीक कर्ज रक्कम स्थानिक शाखेत वर्ग करा – शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांची पीक कर्ज रक्कम स्थानिक शाखेत वर्ग करा – शेतकऱ्यांची मागणी

रजनीकांत पाटील

अमळनेर,ता.11-तालुक्यातील सन 2020-21 ह्या आर्थिक वर्षातील पीक कर्ज रक्कम बँकेने राष्ट्रीयकृत शाखेत न वर्ग करता शेतकऱ्यांच्या स्थानिक शाखेत वर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2020-21 ह्या आर्थिक वर्षाचे पीक कर्ज हे स्थनिक विकास सोसायटी मार्फत भरण्यात आले होते.परंतु आता पीक कर्ज वाटप शासनाने सुरू केले असून जळगांव जिल्हा मध्य.सह. बँकेकडुन शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप एटीएम द्वारा शहर क्षेत्र भागातील आयसीआयसीआय बँकेमार्फत केले जात आहे. याअगोदर जेडीसीसी बँक ही शेतकऱ्यांना मागील वर्षात पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत होती.व पूर्ण रक्कम जेडीसीसी च्या स्थानिक शाखेत शेतकऱ्यांना खात्यातून काढून मिळत होती.परंतु ह्या वर्षी जेडीसीसी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक कर्ज 25 टक्के रक्कम ही खात्यातून गावातील स्थनिक शाखेत मिळणार आहे तर उर्वरित रक्कम ही तालुकास्तरावर असणाऱ्या आयसीसीआय च्या एटीएम शाखेतून काढून घ्यायची आहे.

?? तालुक्याला कोरोनाचा विळखा

अमळनेर शहर-नागरी क्षेत्रात कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराचा गंभीर प्रादुर्भाव असल्याने शहरात वाहन व इतरांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश करणे बंदी आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात प्रवेशास बंदी असुन,वाहनाच्या सोई पुर्णपणे बंद असलेने शहरातच्या एटीएम मध्ये शेतकऱ्यांना पोहचण्यासह पीक कर्जे रक्कम मिळविणे अशक्य व दुरापास्त आहे. शिवाय ग्रामीण भागातील करिता सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना शहरात प्रदेश मिळणे अशक्य असुन धोकेदायक आहे.

??पीक कर्ज रक्कम शेतकऱयांना पूर्ण स्थानिक शाखेतच मिळावे

जिल्हा बँकेच्या शाखा ह्या ग्रामीण भागातच कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना द्यावयाची कर्जे रक्कम ही ग्रामीण भागातील जिल्हा-बँकेच्या उप-शाखात जमा झालेस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सदर पिक कर्जे रकमेची उचल करता येईल.जिल्हा बँकेने शेतकऱ्याची पिक कर्जे रक्कम शहरातील एटीएम मध्ये जमा न करता ग्रामीणशेतकऱ्यांच्या सोईसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील बँकाच्या उप-शाखात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सद्य स्थितीत शेतकऱ्याकडे पैशे उपलब्ध नाहीत.मे महिन्यात शेतकऱयांना बी-बियाणे,खते,व इतर शेती उपयोगी साहित्य विकत घेऊन घरात ठेवावे लागते.परंतु बँकेच्या धोरणामुळे शेतकऱयांना स्वतःचा पैसा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात.शेतकरी वर्ग कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराच्या महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.तरी ह्यावर प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात

प्रा. सुभाष पाटील

चेअरमन विकासो सोसायटी शिरूड ता.अमळनेर जि. जळगाव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button