समाजकार्य महाविद्यालयांची समाज जागृती साठी घ्यावी मदत दिपक सपकाळे यांची डॉ अविनाश ढाकणे यांना विनंती
समाजाच्या समापुदेशन करीता क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एकुण ४ समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची त्वरित मदत घेण्याबाबत विनंती….
जगात सुरु असलेल्या कोविड-१९ (कोरोना) या विषाणु सोबत लढण्यासाठी संपुर्ण जग युद्धपातळीवर कार्य करीत आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आपल्या स्तरावर कार्य करीत आहे परंतु आज ही समाजातील नागरिक जे स्लम एरिया मध्ये राहतात त्यांना मार्गदर्शन आणि समपुदेशनाची अत्यंत गरज आहे.
आणि हि जवाबदारी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतात.
याकरिता विनंती आहे कि आपण क. ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची स्लम एरिया आणि पोलीस प्रशाशनास सहकार्य करण्याकरिता त्यांची सेवा घेण्यात यावी हि नम्र विनंती आणि कदाचित हाच पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवता येईल त्यामुळे आपणास हि नम्र विनंती.