अनुसूचित जमातीचे खोटे दाखले देणारे व घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करा – विजय आढारी
मंचर – प्रतिनीधी दिलीप आंबवणे
अनुसूचित जमातीची बोगस दाखले देणारे अधिकारी व दाखला घेणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करणाची मागणी राजपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी बी घोडे, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी निवेदन ईमेलद्वारे देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासींच्या नावावर घुसखोरी करून बोगस आदिवासींनी, अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटे अनुसूचित जमातीचे दाखले तयार करून त्याआधारे महाराष्ट्रामध्ये दीड लाख अनुसूचित जमातीच्या नोकर्या हडप केलेल्या आहेत तसेच पेट्रोलपंप, गँस एँजेन्सी सुध्दा हडप केलेल्या आहेत या बोगस अनुसूचित जमातीच्या दाखला धारकांची चौकशी करणे कामी माननीय आदिवासी आयुक्त पुणे यांनी वसू पाटील प्रकरणी बोगस दाखला प्रकरण अनुसूचित जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून सन 2004 ते 2010 अखेर चौकशी अहवाल शासनास सादर केला आहे त्या अहवालावर शासनाने अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच नंतर औरंगाबाद अनुसूचित जमाती पडताळणी कमिटी चौकशीकामी एस आय टी स्थापन केली होती तो एस आय टी चा अहवाल सुद्धा शासनाने प्रसिद्ध केला नाही व त्या अहवालप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र अंदाजे एक लाखाच्या पुढे सदर कार्यालयात दिले गेल्याचे असे निदर्शनात आले आहे तरी याबाबत आपणाकडून सखोल चौकशी होऊन अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा 1989 नुसार तसेच आयपीसी कोड नुसार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक जात पडताळणी कायदा 2000 नुसार खोटी कागदपत्रे तयार करणे कागदपत्रांमध्ये खाडाखोड करणे कागदपत्र गहाळ करणे संगनमताने खोटे कागदपत्र तयार करणे व त्याद्वारे अनुसूचित जमाती चे फायदे घेणे याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.






