खासदार इम्तियाज जलील यांना तडीपार करा, आरपीआयची पोलीस आयुक्तांना निवेदन
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद जिल्ह्यातून तडीपार करा, आणि त्यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल करा, असे निवेदन आरपीआयचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना दिले आहे. देशामध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असल्यास त्यांना तडीपार करण्यात येते.
मग देशात सर्वसामान्य लोकांना व खासदारांना कायदा वेगळा आहे का? असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. खासदार इम्तियाज जलील शहरात वातावरण गढूळ करत असून अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा आरोप ही निवेदनात करण्यात आला आहे.






