Pune

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी आश्रमशाळेच्या बेमुदत धरणे आंदोलनास सदिच्छा भेट.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी आश्रमशाळेच्या बेमुदत धरणे आंदोलनास सदिच्छा भेट.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे-: इंदापूर प्रशासकीय भवनासमोर आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष रत्नाकर मखरे (माजी नगराध्यक्ष इंदापूर ) यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी दि.५ सप्टेंबर २०२० पासून आश्रमशाळेकडील विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे, आश्रमशाळेकडील कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न त्वरित सोडवावे ह्या व इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले आहेत. सदर आंदोलनास आज १२ ऑक्टो.२० रोजी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेल्या मागण्या जाणून घेतल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या वतीने सामाजिक न्याय विभागाकडे केलेल्या मागण्या रास्त असून मागण्यांची सोडवणूक सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी व राज्यकर्त्यांनी तातडीने करून त्यांचे प्रश्न सत्वर मार्गी लावावे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलताना आपले मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष मा. रत्नाकर मखरे आज काही कामा निमित्त बाहेरगावी गेल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रत्यक्ष भेट मखरे यांच्याशी होऊ शकली नाही. परंतु भ्रमणध्वनी वरून मखरे आणि पाटील यांची बेमुदत धरणे आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सदरच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. माजी मंत्री पाटील साहेब यांनी मा. संगिता डावखर मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनकर्त्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा. तसेच कोरोना सारख्या महामारीत एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून आंदोलनकर्ते आंदोलनास बसले असून, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार.असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भ्रमणध्वनी वरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे.यांना विचारणा केली.तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्या राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण खात्याचे मंत्री ना. विजय वडे्डटीवार यांच्या कानावर घालणार असल्याचे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले. माजी मंत्री पाटील यांना आंदोलनकर्ते म्हणाले की, भाऊ आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आंदोलनास बसत आहोत. आमच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही बेमुदत धरणे आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेवटी आंदोलनकर्त्यानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button