सायंकाळी 5 पासून पारोळा शहरात 5 दिवस जनता कर्फ्यु
पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी
पारोळा शहरात दि 20 पासून सायंकाळी 5 वाजे पासून पुढील 5 दिवस जनता कर्फ्यु घेत असल्याची माहिती तहसीलदार,नगराध्यक्ष व इतर अधिकारी वर्गाच्या बैठकित घेण्यात आला ।
या वेळी तहसीलदार अनिल गवानदे ,नगराध्यक्ष करणं पवार,मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे,पो नि लीलाधर कानडे,डॉ प्रांजली पाटील,डॉ योगेश साळुंखे, डॉ गिरीश ज्योशी नगरसेवक पी जी पाटील,नवल सोनवणे आदी उपस्थित होते।
यावेळी नगराध्यक्ष करणं पवार यांनी सांगितले की आपल्या तालुक्या लगत अमळनेर,भडगाव व आता धरणगाव ता बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व बाहेरगावच्या नागरिकांची वाढती संख्या शहरात येत असल्याने प्रांत अधिकारी यांच्या आवाहणास प्रतिसाद म्हणून पारोळा तालुक्यात आज पासून पुढील 5 दिवस म्हणजे गुरुवार ते सोमवार असा 100 टक्के बंद घेतला जात आहे।
भाजीपाला एक दिवसा आड -यावेळी उपस्थित अधिकारी व लोकप्रति नि सर्वानु मते काही निर्णय घेतले यात भाजीपाला हा एक दिवसा आड तो ही फक्त कॉलनी भागात परवानगी राहणार आहे ,तर किराणा देखील बंद राहणार आहे ,कृषी दुकाने बंद बाबत असो शि चर्चा करणार असून ,औषधी दुकाने फक्त गरजे पुरता उघडतील ,शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी फक्त ट्रॅक्टर ला परवानगी राहील त्यांना डिझेल पूरविले जाईल, सदर 5 दिवसात मोटर सायकली ना पूर्णतः बंदी असून नियम तोडल्यास कारवाई केली जाईल ,स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप ही 5 दिवस बंद राहतील ,ब्यांका मध्ये गर्दी होणार नाही यासाठी सर्व प्रमुख ब्यांकाना सूचना पत्र दिले जातील,तालुक्यातील प्रमुख 8 सीमा ह्या 100 टक्के बंद केल्या जातील ,रा म 6 वरील वाहतूक ही बाय पास केली जाईल ,दूध डियरी या फक्त सकाळी 2 तर संध्याकाळी 2 तास सुरू राहतील असे निर्णय सर्वानु मते घेतले गेले यावेळी किराणा, भाजीपाला ,आदी असो च्या पदाधिकारी यांनाही बोलावण्यात येऊन माहिती देण्यात आली ।
जनता कर्फ्यु न पाळणाऱ्यां वर गुन्हे दाखल करणार-यावेळी पो नि लीलाधर कानडे यांनी सांगितले की 5 दिवस जनता कर्फ्यु हा तालुक्याच्या जनते साठी आहे आपल्या कडे बाधित संख्या नसून ती वाढू देणे नसेल तर नियमांचे पालन करा न केल्यास गुन्हे दाखल होतील ,दुचाकी धारकांना स्पष्ट सूचना असून दंड कारवाई केली जाईल असे सांगितले तर बाहेर गावाहून येणाऱ्यांची माहिती द्या ,धोका पत्करू नका,असे आवाहन डॉ योगेश साळुंखे,डॉ प्रांजली पाटील यांनी केले असून माहिती लपवणार्या विरोधात गुन्हे दाखल होतील ,असे संकेत दिले गेले तर नगराध्यक्ष करणं पवार यांनी विशेषतः भाजीपाला ,फळ विक्रेत्यांना स्पष्ट करत सांगितले की सूचना,न पाळणाऱ्यांची हायगाय केली जाणार नाही . आज बाजार पेठ जी रोज 2 ला बंद होते ती 5 पर्यंत सुरू राहील त्या नंतर 100 टक्के 5 दिवस बंद चे संकेत उपस्थित मान्यवरांनी दिले।






