Chimur

बंदी असतांनाही नायलाँन मांजाचा सर्रास विक्री नायलाँन मांजा विक्री वर तात्काळ बंदी घाला कवडू लोहकरे यांची मागणी…

बंदी असतांनाही नायलाँन मांजाचा सर्रास विक्री नायलाँन मांजा विक्री वर तात्काळ बंदी घाला कवडू लोहकरे यांची मागणी…

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमुर : मकरसंक्रात अगदी जवळ आली असुन बच्चे कंपनी पतंगी उडविण्यात मग्न झाली आहे. कुठे छतावर तर कुठे रस्त्यावर बच्चे कंपनीचा घोळका बघायला मिळतो. परंतु महाराष्ट्र राज्यात नाँयलान मांजा विक्री वर बंदी असतांनाही चिमुर तालुक्यात नायलाँन मांजाची बेधडक दुकानातुन विक्री होत आहे.पतंग उडविण्याच्या नादात अनेक पक्ष्यांच्या जिव गेला आहे. पतंगी उडवित असतांना उडणारे निष्पाप पक्ष्यांचे पंख मांजा मध्ये अडकून मरन पावले आहेत.कावळा, कोकिळा, पोपट आदी पक्षी मांजा मध्ये अडकून मरण पावले आहे. नाँयलान मांजामुळे तर चक्क मुलांचे व लोकांचे गळे व हात कापले आहे. कुठे तर मुले मरण पावले आहेत. छतावर पतंग उडविण्याच्या नादात मुले खाली पडुन मरन पावले आहेत.

मांजा पक्ष्यांसाठी व नागरिकांसाठी घातक आहे. पर्यावरण संवर्धन अँक्ट १९८६ कलम ५ व १५ यानुसार नायलाँन मांजाची विक्री करणाऱा कारवाईस पात्र आहे. या मांजाचे विघटन होत नाही. अजुनही दुकानातून छुप्या व लपुन छपुन मार्गाने नायलाँन मांजाची विक्री केली जात आहे. तात्काळ नायलाँन मांजा जप्त करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी यांचे कडे करण्यात आली आहे.

पतंग प्रेमींना आवाहन

“”” पतंगप्रेमिंनी पतंग उडविण्याच्या आनंद घ्यावा. पण नायलाँन मांजाचा वापर न करता साधा धागा वापरा. मांजामुळे पक्षी व मुलांचा जिव गेला आहे. मुलांनी छतावर पतंग न उडविता मोकळ्या व खाली जागेवर उडवावे. “”

कवडू लोहकरे
पर्यावरण प्रेमी चिमुर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button