निरा भिमा कारखान्याचे इथेनॉलचे टँकर ऑइल कंपन्यांकडे रवाना मा.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते टँकरचे पूजन
दत्ता पारेकर पुणे
Pune : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल ऑइल कंपन्यांकडे रवाना करण्याचा शुभारंभ बुधवारी (दि.2) कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी मा. हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मा.हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते 2 टँकरचे पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही टँकर चालकांचा सत्कार मा.हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केला.






