पारोळ्यात माहिती सेवा समिती( एन. जी.ओ) ची स्थापना
तालुकाध्यक्षपदी मनोहर केदार तर उपतालुकाध्यक्ष म्ह्णून राहुल पाटील यांची निवड…
प्रतिनिधी : कमलेश चौधरी पारोळा
पारोळा : पारोळा येथे माहिती सेवा समिती चे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने पारोळा तालुका स्तरावर माहिती सेवा समिती (N.G.O.)ची स्थापना करण्यात आली.
समितीच्या तालुकाध्यक्ष पदी मनोहर बापूराव केदार रा. लोणी बु तर उपतालुकाध्यक्ष पदी देवगाव येथील राहुल साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे-भाऊसाहेब सोनवणे-सर चिटणीस, शाम भाऊ बंजारा-कार्याध्यक्ष,शैलेश बन्सीलाल पाटील-कार्याध्यक्ष, जितेंद्र वानखेडे-सचिव, विनोद मणसाराम पाटील-संघटक,फईमखा रहीम खा पठाण-उपकार्याध्यक्ष, कमलेश सोनवणे-उप सचिव,अरविंद जाधव-प्रसिद्धी प्रमुख, सचिन खेडकर-उप संघटक, कुणाल गायकवाड-प्रचार प्रमुख पारोळा तालुका व परिसरात वरील सर्वांची सामाजिक कामगिरी पाजहता आणि जनसामान्यांची सेवा करण्याची कामगिरी बघता वरील कार्यकारणी ची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगीतले. तालुक्यातील सर्व सामान्य माणसांचे प्रश्न व अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडण्यास मदत होणार असल्याचे ही पाटील म्हणाले.






