Baramati

महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्री सलेश भोसले यांची निवड

महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी श्री सलेश भोसले यांची निवड

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री सलेश भोसले यांची निवड करण्यात आली तर सातारा जिल्हा खजिनदार पदी श्री अर्जुन काळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांचे निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्री काश्मीर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
श्री सलेश भोसले हे समता शिक्षण प्रसारक मंडळाचे,मतिमंद विद्यालय सातारा येथे सेवक म्हणून कार्यरत आहेत तर श्री अर्जुन काळे हे यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय जकातवाडी येथे सेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच श्री अर्जुन काळे हे महाराष्ट्र पारधी विकास संस्थचे कार्यध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
दोघांनाही निवडीचे पत्र दिल्यानंतर त्यांनी अशिक्षित समाज्यासाठी,शिक्षण हे कश्याप्रकारे उपयोगी आहे ह्याचे महत्व पटवून दिले.पारधी समाज्यामध्ये असणारी अंधश्रद्धा, रितीरिवाज, अशिक्षितपणा सोडून चांगला मार्ग स्वीकारावा आणि सामाजिक चळवळीत योगदान द्यावे असे मनोगत केले.
कार्यक्रमासाठी श्री काश्मीर शिंदे,श्री अशोक पवार,सचिन शिंदे,उपदेश भोसले आदी महाराष्ट्र राज्य आदिवासी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button