Pune

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण प्रेमींना पुरस्कार वितरण आणि पर्यावरण संबंधी मार्गदर्शन संपन्न

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पर्यावरण प्रेमींना पुरस्कार वितरण आणि पर्यावरण संबंधी मार्गदर्शन संपन्न

पुणे (प्रतिनिधी)

आज रविवार,२२ डिसेंबर २०१९ रोजी, पुणे येथे पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत यांच्यातर्फे संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यावरण संबंधी उल्लेखनीय कार्य करणार्‍या पर्यावरण प्रेमी तसेच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा संस्थेच्या वतीने पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला, यावेळी पर्यावरण विषयी मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर मा.उषा(माई)मनोहर ढोरे , तसेच अध्यक्ष म्हणून I.F.S.वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्य चे मा.रंगनाथ नाईकडे तसेच संस्थेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक देवा तांबे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापौर मा.उषा मनोहर ढोरे , नगरसेविका शारदाताई सोनवणे, संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे व संस्थेचे राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्षांच्या रोपांना पाणी देऊन करण्यात आली.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास आवर्जून सन्माननीय उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड फिल्म अभिनेते व संस्थेचे ब्रँड अँबेसॅडर मा.ज्यु.गोविंदा जी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ठ पर्यावरण कार्य करणाऱ्या पदाधिकारी व जिल्हे टिम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर संस्थेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी श्री.विलास चौधरी, विजय चौघळा,कुमुद शहाकार, मधुकर तिरके, सौ.आशा वरपे, सीता महासाहेब, जिजाबराव पाटील, अनामिका चौधरी यांच्यासह संस्थेचे भारतातील विविध भागातील प्रतिनिधी कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित जिल्हे पदाधिकारी यांना मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना महापौर उषा मनोहर ढोरे ,नेफडॊ संस्थेचे राज्य अध्यक्ष दिपक भवर, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे , ब्रँड अँबेसॅडर ज्यु.गोविंदा व IFS वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चे मा.रंगनाथ नाईकडे यांनी पर्यावरण संरक्षण काळाची गरज यांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ठरीत्या सूत्रसंचालन संस्थेच्या वसई तालुका महिला मुख्य संघटक सौ.संगीता पाध्ये यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button