Pandharpur

राष्ट्रीय चर्मकार महासंघ सांगोला तालुका कार्यकारिणी जाहीर…

राष्ट्रीय चर्मकार महासंघ सांगोला तालुका कार्यकारिणी जाहीर…

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : सोलापूर राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने राज्यभर चर्मकार समाजाला एकत्रित आणून समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बबनराव घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याच अनुषंगाने संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे तसेच अशोक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गुरू रविदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सोलापूर जिल्ह्यातून
आलेल्या पदाधिकारी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सांगोला तालुका अध्यक्षपदी किरण डांगे, सांगोला तालुका युवक अध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष धर्मेंद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्षपदी मच्छिंद्र कांबळे,
सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी विनित कांबळे, तालुका उपाध्यक्ष पदी राजसिह कांबळे, पंढरपूर तालुका
कार्याध्यक्षपदी सुनील रोकडे, पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी महादेव कांबळे या सर्व पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडीचा कार्यक्रम हॉटेल अजिंक्यतारा वाकीशिवणे तालुका सांगोला या ठिकाणी घेण्यात आला.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, मार्गदर्शक अशोक लामतुरे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजय भाग्यवंत, माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट दत्ता खडतरे, मधुकर कांबळे, दगडू माने, सोलापूर जिल्हा सचिव सुधाकर कांबळे, पंढरपुर शहराध्यक्ष नवनाथ कांबळे,युवक जिल्हाध्यक्ष शैलेश आगवणे, धर्मेंद्र कांबळे, रमेश माने, संजय भाग्यवंत, राजसिंह कांबळे, आनंदा खडतरे, अमोल कांबळे, मच्छिंद्र कांबळे, सुनील रोकडे, पंढरपुर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, हरीभाऊ बनसोडे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————-
चौकट: राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही संघटना अराजकीय संघटना असून संघटनेच्या ध्येय धोरणांना कुठेही गालबोट लागता कामा नये संघटनेच्या पदाचा गैरवापर होऊ नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. चर्मकार महासंघाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभा करून समाज हितासाठी आपले योगदान द्यावे असे मत संघटनेचे मार्गदर्शक अशोक लामतुरे यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यात सातत्याने चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवून अन्याय करणारांवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, चर्मकार समाज संघटित झालेला आहे, याचे सर्वांनी भान ठेवून एकोप्याची भावना ठेवावी असे मत प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाची प्रकरणे मार्गी लावण्याचे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button